Wednesday, August 26, 2026
Homeगडचिरोलीउज्ज्वला योजनेसह घरगुती एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांना ई-केवायसी अनिवार्य…

उज्ज्वला योजनेसह घरगुती एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांना ई-केवायसी अनिवार्य…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- केंद्रातील भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाने उज्ज्वला योजनेसह घरगुती एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांना ई-केवायसी अनिवार्य केली आहे.त्यानुसार ग्राहकांना जोडणी असलेल्या गॅस एजन्सीत जाऊन बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.प्रक्रिया न केल्यास ग्राहकाला प्रति सिलिंडरवर मिळणारे अनुदान (सबसिडी) बंद होणार आहे.

सध्या गॅसधारकाला संबंधित एजन्सीकडून तसे संदेश मोबाइलवर येत आहेत.ग्राहकाला (गॅस जोडणी ज्याच्या नावाने असेल) ई-केवायसी करण्यासाठी त्याच्या एलपीजी गॅस एजन्सीच्या कार्यालयात जावे लागेल.येथे येताना लाभार्थ्यांचा मोबाइल व आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे.सदर कार्यालयात ग्राहकाचा बायोमेट्रिक अंगठा घेऊन एक प्रक्रिया एजन्सीकडून केली जाईल.त्यानंतर ग्राहकाला परत जाता येईल.दरम्यान ही ई-केवायसी प्रक्रिया न केल्यास ग्राहकाचे गॅस सिलिंडर वितरण व अनुदानही बंद होऊ शकते.

एखाद्या ई-केवायसी न केलेल्या ग्राहकासोबत असे झाल्यास तो संबंधित एजन्सीमध्ये जाऊन ही प्रक्रिया नंतरही करू शकतो.गॅस कंपनीकडून संबंधित ग्राहकाची गॅस जोडणी पुन्हा सुरू होईल.ग्राहकांनी त्यांच्या गॅस जोडणीची सुरक्षा तपासणीही करून घेणे अनिवार्य आहे.दरम्यान ई-केवायसीमुळे तुमचा मोबाइल क्रमांक बदलला आहे.तो तात्काळ अपडेट होईल,जोडणी धारकाचा मृत्यू झाला असल्यास संबंधित जोडणी दुसऱ्याच्या नावावर करता येईल. गॅस जोडणीमध्ये इतर काही अडचणी असल्यास त्या दुरुस्त करता येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!