Tuesday, July 14, 2026
Homeगडचिरोलीआता इंजिनविना धावणार शैक्षणिक गाडी…-१५० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेतील मुख्याध्यापकही होणार अतिरिक्त…

आता इंजिनविना धावणार शैक्षणिक गाडी…-१५० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेतील मुख्याध्यापकही होणार अतिरिक्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- आतापर्यंत आपण शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होतात; हे पाहिले आहे. पण आता शाळेतील मुख्याध्यापक सुद्धा अतिरिक्त झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका.संच मान्यतेच्या नवीन निकषात तशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी शासनाने शिक्षण क्षेत्राला वेठीस धरू नये; अशी अपेक्षाही मुख्याध्यापक व शिक्षण तज्ज्ञ करीत आहेत.

१५ मार्च २०२४ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संच मान्यतेचा सुधारित निकष या गोंडस नावाचा एक शासन निर्णय निर्गमित केला आहे.त्याच शासन आदेशात मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय होण्यासाठी सुद्धा कलम ४ आणि ४.१ मध्ये काही निकष दिलेले आहेत.त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जून २०२४-२५ पासून या शासन निर्णयानुसार पद निश्चिती होईल.त्यातील तरतुदीनुसार आता माध्यमिक शाळेतील सर्व वर्गाची विद्यार्थी संख्या जर १५० पेक्षा कमी झाली तर त्या शाळेतील मुख्याध्यापक अतिरिक्त ठरेल.एका अर्थाने त्या शाळेत मुख्याध्यापक असणार नाही.इंजिनविना ही शैक्षणिक गाडी धावणार आहे.विशेष म्हणजे या शासन निर्णयात यापूर्वीचे या विषयाशी संबंधित म्हणजेच शाळातील मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पद मान्यता ठरविणारे म्हणजे २८ ऑगस्ट २०१५, ८ जानेवारी २०१६, २ जुलै २०१६ व १ जानेवारी २०१८ हे चारही शासन निर्णय या नव्या आदेशानुसार अधिक्रमित केले आहेत.अतिरिक्त ठरविण्यासाठी आता सन २०२४-२५ पासून हाच, म्हणजे १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय ग्राह्य धरला जाणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!