Friday, October 16, 2026
Homeगडचिरोलीमहिला पोलिस उपनिरीक्षकास किरकोळ जखमी करणाऱ्या आरोपी मायलेकींना कारावास…-देसाईगंज,गांधीवॉर्डातील आरोपी…

महिला पोलिस उपनिरीक्षकास किरकोळ जखमी करणाऱ्या आरोपी मायलेकींना कारावास…-देसाईगंज,गांधीवॉर्डातील आरोपी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- शासकीय कामात अडथळा निर्माण करुन महिला पोलिस उपनिरीक्षकास किरकोळ जखमी करणाऱ्या आरोपी मायलेकींना जिल्हा व सत्र न्यायालयाने काल, सोमवारी दिनांक-१ एप्रिल रोजी २ महिने कारावास व प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा,दंड न भरल्यास १० दिवस वाढीव शिक्षा ठोठावली आहे.

रजनी रामचंद्र आत्राम वय ४७ वर्ष, शितल रामचंद्र आत्राम,वय २६ वर्ष दोन्ही रा.गांधीवॉर्ड देसाईगंज अशी शिक्षा ठोठावलेल्या महिला आरोपींची नावे आहेत.सविस्तर असे की,पोलिस स्टेशन देसाईगंज येथील फिर्यादी महिला पोलिस उपनरीक्षक सोनम नाईक या आपल्या हद्दीतील महिला पोलिस उपनिरीक्षक सुजाता भोपळे व पोस्टे स्टाफसह प्रोव्ही रेड कामी २७ ऑक्टोबर २०१२ रोजी देसाईगंज शहरात पेट्रोलिंग करीत होत्या.दरम्यान,गांधीवॉर्ड देसाईगंज येथील आरोपी रजनी आत्राम ही तिच्या राहत्या घरी अवैधरीत्या देशी,विदेशी दारूची विक्री करते,अशी गोपनिय माहिती मिळाल्याने पंचांना प्रोव्ही रेड बाबत माहिती देऊन,पंचांसमक्ष आरोपीच्या घराची झडती घेतली.यावेळी दुसरी महिला आरोपी शितल आत्राम हिने शिविगाळ करून एकाएकी फिर्यादीच्या अंगावार जावून दोन्ही हात पकडून शोकेस आलमारीकडे ढकलत नेले.मान खाली दाबून मानेवर बुक्यांनी मारले.सोबत असलेल्या मपोउपनि सुजाता भोपळे यांचेही दोन्ही हात पकडून खाली ढकलून दिले.तेव्हा पोलिस स्टाफ व पंचांनी समजाविण्याचा प्रयत्न केला.तरी सुद्धा आरोपींनी अश्लिल शब्दात शिविगाळ केली.फिर्यादींनी याबाबतची तक्रार पोलिस स्टेशन देसाईगंज येथे २७ ऑक्टोबर २०१२ रोजी दिली.तक्रारीवरुन आरोपींवर कलम ३५३,३३२,५०४ व ३४ भांदवी अन्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपीस २८ ऑक्टोबर २१० रोजी अटक केली. तपास पूर्ण करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून १ एप्रिल २०२४ रोजी आरोपी रजनी आत्राम,शितल आत्राम,  रा.गांधीवॉर्ड देसाईगंज जि.गडचिरोली या दोघींना  जिल्हा व सत्र न्यायाधीश,आशुतोष नि.करमरकर गडचिरोली यांनी आरोपीला कलम ३५३,३४ भांदवी मध्ये दोषी ठरवून २ महिने कारावास व प्रत्येकी १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १० दिवस वाढीव शिक्षेची तरतूद करण्यात आली.सरकारी पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!