Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीनक्षली महिलेस अटक; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई-सहा लाखांचे होते बक्षिस……

नक्षली महिलेस अटक; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई-सहा लाखांचे होते बक्षिस……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- सहा लाखांचे बक्षिस असलेल्या महिलेस गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून सदर महिला विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राजेश्वरी उर्फ कमला पाडगा गोटा,असे अटक करण्यात आलेल्या नक्षलीचे नाव असून,ती छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील बडा काकलेर येथील रहिवासी आहे.

राजेश्वरी गोटा ही २००६ मध्ये नक्षल्यांच्या चेतना नाट्य मंचमध्ये पहिल्यांदा सहभागी झाली. त्यानंतर ती उपकमांडर झाली. पुढे छत्तीसगडमधील फरसेगड दलममध्ये ती कार्यरत राहिली. २०१९ मध्ये तिला अटक करण्यात आली होती. २०२० मध्ये सुटका झाल्यानंतर ती दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीत एरिया कमिटी मेंबर म्हणून कार्यरत होती. छत्तीसगड राज्यातील विविध ठिकाणी तसेच गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील केडमारा येथे २०२३ मध्ये झालेल्या चकमकीत तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने तिच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!