Saturday, October 24, 2026
Homeगडचिरोलीमहानाट्यातून उलगडला ‘बिरसा मुंडा’ यांचा जीवनप्रवास…-महासंस्कृती महोत्सवात झाडीपट्टी कलाकारांनी वेधले लक्ष…

महानाट्यातून उलगडला ‘बिरसा मुंडा’ यांचा जीवनप्रवास…-महासंस्कृती महोत्सवात झाडीपट्टी कलाकारांनी वेधले लक्ष…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत

गडचिरोली :- आदिवासी समाजक्रांतीचे जनक व आद्य क्रांतीकारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या जीवनप्रवासाचा उलगडा आज दिनांक – १८ फेब्रुवारी रोजी बिरसा मुंडा महानाट्यातून महासंस्कृती महोत्सवात सादर करण्यात आला. या महानाट्याचा प्रेक्षकांनी आनंद घेतला. 

सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पटांगणात सुरू असलेल्या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या तीसऱ्या दिवशी बिरसा मुंडा  हे महानाट्य सादर करण्यात आले.समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मस्तोळी,कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे,नायब तहसिलदार संगीता धकाते व ज्योती तायडे तसेच विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

बिरसा मुंडा यांच्या जीवनप्रवास सांगणाऱ्या या महानाट्याची निर्मिती लोकजागृती संस्था चंद्रपूर यांची होती.लेखन चुडाराम बल्लारपुरे यांचे तर दिग्दर्शन अनिरुद्ध वनकर यांचे होते.संगीत लोकेश दुर्गे,ईश्वर खोब्रागडे व चेतन रामटेके यांचे,नेपथ्य हरेंद्र आणि प्रकाश योजना सौरभ मेश्राम यांची होती.कलावंत निखिल मानकर,भारत रंगारी,संजीव रामटेके,रूपाली खोब्रागडे, राणी मेश्राम, प्रवीण भसारकर, जुगल गणवीर, विजय गुरुनुले, पिंटू खोब्रागडे, अमित दुर्गे, स्नेहल वाटगुरे, गुरु मोहुर्ले, मयूर मस्के, शुभम गुरनुले, अंकुश शेडमाके,  किशोर सातपुते, अभिषेक मोहुर्ले, प्रियंका गेडाम, प्रवीणा लाडके, संजना येरमेकर या झाडीपट्टीच्या कलाकारांनी आपल्या अभिनयातून बिरसा मुंडा यांचे जीवनचरित्र  साकारतांना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

बिरसा मुंडा यांच्या बालपणापासून त्यांच्या जीवनाच्या अखेरपर्यंतचे क्षण महानाट्यातून साकारण्यात आले. त्यांचे बालपण, शिक्षण, आदिवासी समाजाला एकत्र करून उभारलेले ‘उलगुलान’ आंदोलन,  सर्वसामान्य जनतेवरील अन्याय करणाऱ्या इंग्रज अधिकारी, ठेकेदार, जमीनदार, सावकार यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा, ब्रिटिश कायद्यांविरूद्ध विद्रोह व लढाई  महानाट्यातून सादर करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या महानाट्याला हौशी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.महासंस्कृती महोत्सवाच्या उद्या चौथ्या हास्य जत्रा कार्यक्रमाचे सादरीकरण होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!