Thursday, June 4, 2026
Homeगडचिरोली३२ वर्षीय जहाल नक्षल्यास गडचिरोली पोलिसांनी केली अटक…-आजची घटना…

३२ वर्षीय जहाल नक्षल्यास गडचिरोली पोलिसांनी केली अटक…-आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- हत्या,चकमकी आणि जाळपोळीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या छत्तीसगड राज्यातील महेंद्र वेलादी वय ३२ वर्षे या नक्षल्यास गडचिरोली पोलिसांनी आज दिनांक- ६ डिसेंबर रोजी अहेरी तालुक्यातील दामरंचा गावानजीक अटक केली.महेंद्र वेलादी हा छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील चेरपल्ली येथील रहिवासी आहे.तो २००९ मध्ये नक्षल दलममध्ये सहभागी झाला.सुरुवातीला पुरवठा समिती आणि सध्या नॅशनल पार्क एरियामधील सँड्रा दलममध्ये कार्यरत होता.सध्या नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु असून,या सप्ताहात ते हिंसक कारवाया करतात. 

आज महेंद्र वेलादी हा दामरंचाजवळच्या इंद्रावती नदी परिसरात पोलिसांच्या हालचालींची माहिती देण्याच्या हेतूने फिरत असताना विशेष अभियान पथक आणि केंद्रीय राखीव दलाच्या ९ क्रमांकाच्या बटालियनच्या जवानांनी त्यास अटक केली.दामरंचा आणि मन्नेराजाराम या दोन्ही ठिकाणच्या पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या हालचालींवर तो पाळत ठेवून होता.२०२३ मध्ये कापेवंचा-नैनेर जंगलात वनाधिकाऱ्यांवर हल्ला आणि जाळपोळीच्या घटनेत त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.२०२२ मध्ये टेकामेट्टा येथे झालेल्या चकमकीसह सँड्रा येथे २०२३ मध्ये झालेल्या एका नागरिकाच्या हत्येतही तो सहभागी होता.महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.अशी माहिती पोलिसांनी दिली.जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत पोलिसांनी ७२ नक्षल्यांना अटक केली आहे.पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान),यतीश देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!