- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान,चेंबूर(मुंबई) या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर अत्यंत मानाचा व दर्जेदार समजला जाणाऱ्या या पुरस्काराकरीता मराठी नाट्य साहित्य प्रकारात विदर्भातील प्रसिध्द नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित ‘जत्रा घडली नागोबाची ‘ या लोकनाट्यास यंदाचे नाट्यलेखनाचे पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचे विश्वस्त व संस्थापक आनंद सांडू यांनी कळविले असून मुंबईच्या चेंबूर येथील सांडूवाडी प्रतिष्ठानात लवकरच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र व सन्मानपत्र असे आहे.
विशेष म्हणजे,या नाटकास यापूर्वी साहित्य विहार संस्था,नागपूर यांचा डॉ.प्रज्ञा निनावे पुरस्कृत उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार-२०२५,(२) अ.भा.मातोश्री जिजाऊ परिवर्तन सामाजिक शिक्षण संस्था,गोंदिया यांचे नटसम्राट पुरस्कार-२०२६,(३)यशदा पुणे,संवाद पुणे,पुणे महानगर पालिका व मराठी भाषा संवर्धन समिती,पुणे यांचे उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार-२०२६.(४)शिवांजली साहित्यपीठ,चाळकवाडी (ता. जुन्नर,जि.पुणे)यांचा स्व.सयाजी चाळक स्मृती उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार-२०२६ व (५) महाराष्ट्र साहित्य परिषद,शाखा- दामाजीनगर यांचा शहिद राजकुमार ठोंबरे स्मृती उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार-२०२६ व (६) स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी (जि.सातारा) यांचे श्री राजाराम डाकवे (तात्या) स्मृती पुरस्कार- २०२६ असे सहा पुरस्कार प्राप्त झाले असून हा सातवा पुरस्कार आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल आनंद इंदिरा श्रीधर सांडू(साहित्यिक),मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर व नाट्यश्रीच्या तसेच झाडीपट्टीच्या कवी,साहित्यिक व कलावंतांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
- Advertisement -

