- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३६ अन्वये आदेश जारी केला आहे.हा आदेश संपूर्ण जिल्ह्यात ११ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत लागू राहील.
या आदेशानुसार सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना मिरवणुकांचे मार्ग व वेळ निश्चित करणे,सभा व मिरवणुकांमध्ये सहभागी नागरिकांच्या वर्तनाबाबत निर्देश देणे, धार्मिक स्थळांजवळील वर्तनावर निर्बंध घालणे तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य व ध्वनिक्षेपकांच्या वापरावर निर्बंध व मर्यादा घालण्यासाठी लेखी किंवा तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.त्यांना सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्देश देण्याचे तसेच अधिनियमांतर्गत जारी संबंधित अन्य आदेशांची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचेही अधिकार देण्यात आले आहेत.
सदरचा आदेश येत्या,रविवार ११ ऑक्टोंबर रोजी पासून २३ ऑक्टोंबरपर्यंत लागू राहील.आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती अधिनियमाच्या कलम १३४ अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहील,असे पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी कळविले आहे.
- Advertisement -

