- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ)जवानाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत घडली.राहुल प्रभाकर शिंगाडे वय ३५ वर्षे असे सर्पदंशाने मृत पावलेल्या जवानाचे नाव असून ते मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी होते.
राहुल शिंगाडे हे आज मंगळवारच्या सकाळी ११.३० च्या सुमारास स्नानगृहात आंघोळीसाठी जात असतांनाच त्यांना एका सापाने दंश केला.सर्पदंशाची घटना लक्षात येताच त्यांना तात्काळ चामोर्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे प्राथमिक उपचार करून दुपारच्या सुमारास पुढील उपचारार्थ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र,तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. दरम्यान,पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून घटनेची नोंद केली.घटनेने राज्य राखीव पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

