Saturday, September 26, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सहा ठिकाणी अग्निवीर भरती मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली,सेना भरती कार्यालय,नागपूर आणि लाॅईड्स मेटल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सदरचे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.
अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून सेवा करण्याची संधी उपलब्ध आहे.जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी,पात्रता व निवड प्रक्रियेबाबत त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि भरतीसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे,हा या मेळाव्यांच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
  • मेळाव्यांचे वेळापत्रक👇
१० ऑगस्ट २०२६ : सकाळी १० वाजता शिवाजी कॉलेज,धानोरा रोड,गडचिरोली येथे,तर दुपारी ३ वाजता श्री.गोविंदराव मुनघाटे कॉलेज,कुरखेडा येथे मेळावा होणार आहे.
११ ऑगस्ट २०२६ : सकाळी १० वाजता राज विद्या निकेतन,हेडरी येथे,तर दुपारी ३ वाजता जय परसापाने सायन्स कॉलेज,भामरागड येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
१२ ऑगस्ट २०२६ : सकाळी १० वाजता राजे धर्मराव आर्ट्स कॉलेज,आलापल्ली येथे,तर दुपारी ३ वाजता महात्मा फुले कॉलेज,आष्टी येथे मार्गदर्शन मेळावा होणार आहे.
या मेळाव्यांमध्ये सेना भरती कार्यालय,नागपूर येथील अधिकाऱ्यांमार्फत अग्निवीर भरती प्रक्रिया,पात्रता निकष,वयोमर्यादा,निवड प्रक्रिया,सेवाकाल,वेतन,सेवा निधी,सेवेनंतर उपलब्ध होणाऱ्या विविध संधी तसेच इतर सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी उमेदवारांना भरती प्रक्रियेसंदर्भातील विविध बाबी समजून घेण्याची तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करून घेण्याची संधी मिळणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अग्निवीर भरतीसाठी पात्र व इच्छुक युवक-युवतींनी १० ते १२ ऑगस्टदरम्यान निर्धारित वेळेनुसार संबंधित ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शन संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!