- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत.अशा परिस्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राबविलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ आता आधार प्रमाणीकरणाशी जोडण्यात आला आहे.या योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे.यासोबतच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात आणि बँकांचे कर्ज वेळेत भरतात,अशा शिस्तबद्ध कर्जदारांनाही शासनाने दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली.अश्यातच शासनाच्या निर्देशानुसार कर्जमाफीचा लाभ थेट पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचावा आणि अपात्र लाभार्थीना लाभ मिळू नये यासाठी आधार प्रमाणीकरणाची अट घालण्यात आली आहे.ओटीपी, बायोमेट्रिक किंवा आयरिस स्कॅनच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ओळख निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती अचूक असणे तसेच मोबाइल क्रमांक आधारशी जोडलेला असणे आवश्यक आहे. योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या आधार कार्ड सेवा केंद्रांमध्ये जाऊन आपले आधार कार्ड प्रमाणीकरण(व्हेरिफिकेशन)करून घ्यावे.आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
- Advertisement -

