Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीएनएसडिसी दिल्लीतर्फे पहिल्या आंतरराष्ट्रीय  रोजगार मेळाव्याचे आयोजन- जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ...

एनएसडिसी दिल्लीतर्फे पहिल्या आंतरराष्ट्रीय  रोजगार मेळाव्याचे आयोजन- जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त                                                   

गडचिरोली :- भारतातील उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा २१ फेब्रुवारी २०२३ ते २६ मे २०२३ या दरम्यान नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन दिल्ली (एनएसडीसी) यांचे मार्फत आयोजीत करण्यात आलेला आहे.सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवार/उद्योजकांना सहभागी होण्याकरीता खालीलप्रमाणे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

सदर जॉब फेअर मध्ये उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर नोंदणी करावयाची आहे.👇

https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/

तसेच विविध कंपन्या /उद्योजकांनी सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावयाची आहे.

www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Company/

सदर रोजगार मेळावा हा ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता उमेदवारांना एनएसडीसीच्या पोर्टलवर वरील प्रमाणे नोंदणी करणे आवश्यक आहे. मेळाव्यामध्ये उमेदवारांची प्राथमिक फेरी व अंतीम फेरीचे आयोजन करण्यात येणार असून समारोपीय कार्यक्रमसुद्धा आयोजीत केलेला आहे.या मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या उद्योजकातर्फे प्राथमिक व अंतीम फेरी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून समारोपीय कार्यक्रमाकरीता संबंधीत उद्योजक प्रत्यक्ष हजर राहणार आहे.वेगवेगळया झोन मध्ये वेगवेगळया दिवशी प्राथमिक आणि अंतीम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये युएसए,कॅनडा,युके,युरोप,पश्चिम आणि दक्षिण आशिया,जपान,आस्ट्रेलिया,न्युझिलंड, पूर्व आणि दक्षिण पूर्व आशिया व भारतातील नामांकीत उद्योजक ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत. 

ऑटोमोटीव्ह,कृषी,कारपेंटर,बांधकाम,ड्रायव्हर, इलेक्ट्रिशिअन,फॅसिलीटी मॅनेजमेंट,फूड आणि बेव्हरेज,हेल्थ केअर,हॉस्पीटॅलीटी,आयटी,लॉजीस्टीक, ऑइल ॲड गॅस,प्लंबर,रेफ्रिरेजेशन,रिटेल सर्व्हिस, शिपयार्ड,वेल्डर इ.क्षेत्रामध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.उमेदवारांकरीता महाराष्ट्रात मुंबई येथे प्राथमिक आणि अंतीम फेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

सदर जॉब फेअरची प्रक्रीया आणि टाईमलाईन पूढीलप्रमाणे  👇

स्क्रीनिंग आणि भाषा चाचणी ऑनलाइन,उमेदवार ऑनलाइन मॅपिंग,भारतातील विविध शहरामध्ये प्राथमिक फेऱ्या ११ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३, संपूर्ण भारतातील विविध शहरामध्ये अंतिम फेरी८ मे ते १५ मे २०२३,समारोपीय समारंभ २६ मे २०२३ या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून किमान २००० उमेदवारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीची संधी प्राप्त करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

निवड झालेल्या उमेदवारांचे परदेशात प्रस्थानापूर्वी आवश्यक प्रशिक्षण एनएसडीसी मार्फत आयोजीत करण्यात आले आहे. या बाबत अधिक माहीतीकरीता श्रीमती पंघोरी बोरगोएन  व्यवस्थापक एनएसडीसी  मोबाइल क्र. 9599495296 आणि ईमेल आयडी  pangkhuri.borgohain@nsdcindia.org येथे संपर्क साधावा.नोंदणी करण्याची अंतिम मुदत ९ एप्रिल २०२३ ही आहे.

पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी   लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल बॅरेक क्र.२ गडचिरोली यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!