Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीबसचा अपघात; तिघांचा मृत्यू,तर अनेक प्रवाशी जखमी..

बसचा अपघात; तिघांचा मृत्यू,तर अनेक प्रवाशी जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एसटी महामंडळाच्या बसचा आज, गुरुवारच्या सकाळी भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला,तर ३० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील नवेगाव-मुरखळा गावाजवळील वळणावर घडली.अपघातात सात वर्षीय शिवांश स्वप्नील नवघरे,ख्वाजा शाहबुद्दीन वय ६० वर्षे व लक्ष्मीबाई दुरकीवार वय ५५ वर्षे अशी मृतांची नावे आहेत.तर अपघातातील जखमी बस चालक रोहित देशमुख रा.अकोला,श्वेता स्वप्नील नवघरे रा.चामोर्शी, डॉ.गणेश जैन रा.गडचिरोली,वाहक संदीप प्रल्हाद पवार, ऋषभ खडके,सचिन वाळके,जयश्री वरभे,सचिन वरदे, जयश्री खाणके,रत्नाकर राऊत,पार्थ राऊत,मंगला कळसकर,भूषण दुरकीवार,विकी सुरेश शेंडे,तारा साबळे, श्रीहरी खळकर,बेबीबाई खळकर,चैतन्य मेडीवर,तानिया मेडीवर,वैशाली माडेवार,रूपाली खणके,ललिता खणके, धनश्री ललित चांदेकर,आशिष संघपाल साखरकर, मायाबाई बाबुराव कांबळे,संगीता बाबुराव कांबळे,ज्योती अविनाश पाल सर्वजण यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील रहिवासी आहेत.तर व्यंकट ढगे,सुमन कत्तलवार, गौरव कुमरे,अश्विनी तोरपे यांच्यासह अन्य काही प्रवासी जखमी झाले आहेत.
आज सकाळच्या सुमारास एमएच १४ बीटी-०७४० क्रमांकाची बस गडचिरोली आगारातून चंद्रपूर मार्गाहून यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेडकडे निघाली होती. सुरळीत प्रवास सुरू असतांनाच सकाळी साडे सातच्या सुमारास गडचिरोलीपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर नवेगाव-मुरखळा गावाजवळील वळण मार्गावर बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बसने मार्गावरील लोखंडी कठडा तोडून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी घेतली.अपघात घडताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.प्रवाशांनी मोठ्याने आवाज करताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले.काही प्रवाशांना बसच्या खिडक्या फोडून बाहेर काढण्यात आले.घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करून जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेनंतर एसटीच्या सुरक्षिततेबाबत  प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!