Tuesday, July 7, 2026
Homeगडचिरोली'माझं गाव,आरोग्य संपन्न गाव' मोहिमेत गडचिरोली जिल्ह्यातील ४५९ ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग..

‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेत गडचिरोली जिल्ह्यातील ४५९ ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
​गडचिरोली :-ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम,गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे.याच मोहिमेला मूर्तरूप देण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेने प्रभावी पाऊल उचलले असून,जिल्ह्यातील सर्व ४५९ ग्रामपंचायतींनी या मोहिमेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
​सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मांडलेल्या ‘आरोग्य संपन्न गाव’ या संकल्पनेचा मूळ उद्देश प्रत्येक खेडे आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि आजारमुक्त बनवणे हा आहे.या संकल्पनेची गडचिरोली जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे स्वतः लक्ष घालत असून,दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहचवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
  • सुहास गाडे,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प. गडचिरोली👇
​आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतील ‘आरोग्य संपन्न गाव’ साकारण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.जिल्ह्यातील ४५९ ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग हा या मोहिमेच्या यशस्वीतेचा मोठा पुरावा आहे.
आरोग्य विषयक उपक्रमांचा धडाका👇
​जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग जिल्ह्यात विविध आरोग्यवर्धक उपक्रम राबवणार आहे.यामध्ये
​ सर्वसमावेशक आरोग्य तपासणी: गावागावांत विशेष शिबिरे आयोजित करून नागरिकांची आरोग्य तपासणी करणे.
​कुटुंब कल्याण कार्यक्रम: माता-बाल संगोपन आणि कुटुंब कल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवणे.
​प्रतिबंधात्मक उपाययोजना: साथरोग नियंत्रण आणि स्वच्छतेबाबत व्यापक स्तरावर जनजागृती करणे.
ग्रामपंचायतींशी संवाद आणि प्रशासकीय आवाहन👇
​ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  पंकज भोयर यांनी या मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींशी संवाद(डायलॉग) साधून त्यांना मोहिमेत सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे.प्रत्येक गावाने आपले आरोग्यविषयक उद्दिष्ट साध्य करून हे अभियान एका लोकचळवळीच्या स्वरूपात राबवावे,अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
​एकजुटीने निरोगी गडचिरोलीकडे..
 
​गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ४५९ ग्रामपंचायतींच्या सहभागामुळे जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिक सुधारेल आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘आरोग्य संपन्न’ गाव निर्माण होण्यास मदत होईल,असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

तारेवर ओले कपडे वाळवायला गेली अन् क्षणात जीव गमावून बसली..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-घरातील कपडे धुवून घराशेजारी असलेल्या विद्युत खांबाच्या बाजूला असलेल्या अर्तींग तारेवर ओले कपडे वाळवतांना विद्युतचा जोरदार शॉक लागून एका ४५ वर्षीय महिलेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!