- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.येत्या, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल,अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी पुण्यात केली.पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या सिंचन नगर मैदानावर आयोजित “पुणे कृषी हॅकाथॉन-२०२६” च्या पारितोषिक वितरण समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली.कर्जमाफीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून, प्रशासकीय प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. ‘काही विशिष्ट जिल्ह्यांकडून कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे.हा डेटा प्राप्त होताच अधिकृत अंमलबजावणी सुरू होईल,’ असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील सरकारची भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून,लवकरच कर्जमाफीचा मोठा निर्णय जाहीर होईल.सरकारने शेतकऱ्यांना वीज बिलात मोठी सवलत दिली आहे.सध्या खतांच्या पुरवठ्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणीही लवकरच मार्गी लावल्या जातील,असेही त्यांनी स्पष्ट केले.
- Advertisement -

