Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली येथे १२७ जोडपी विवाह बंधनात- जिल्हा पोलिस दल तथा मैत्री परिवार...

गडचिरोली येथे १२७ जोडपी विवाह बंधनात- जिल्हा पोलिस दल तथा मैत्री परिवार संस्थेचा पुढाकार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्हा पोलिस दल तथा मैत्री परिवार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अतिदुर्गम,नक्षलग्रस्त भागातील आदिवासी युवक,युवती व आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांचा विवाह सोहळा आज २६ मार्च २०२३ रोजी चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मोठ्या थाटात संपन्न झाला.

जिल्ह्यातील आदिवासी समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकूवत आणि आत्मसमर्पित नक्षलवादी युवक युवतींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या तसेच नागरिकांच्या मनातील भय दूर करण्यासाठी जिल्हा पोलिस विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. याअंतर्गत जिल्हा पोलिस दल तसेच मैत्री परिवार संस्था यांच्या पुढाकारातून अतिदुर्गम भागातील १२७ आदिवासी युवक व युवतींचा सामूहिक विवाह सोहळा आज पार पडला.यात ८ आत्मसमर्पित नक्षली युवक-युवतींचा समावेश आहे.विवाह सोहळ्याला पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अप्पर पोलिस अधीक्षक अनुज तारे,अप्पर पोलिस अधीक्षक कुमार चिंता,अप्पर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख,नागरी कृती शाखा प्रभारी अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक धनंजय पाटील,पोलिस उपनिरीक्षक सागर झाडे,खासदार अशोक नेते,प्रा.मूनिश्र्वर बोरकर,जिल्ह्यातील पदाधिकारी,कर्मचारी व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!