- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा ही उद्या,शुक्रवार २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.सदरची परीक्षा ही २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ पर्यंत होणार आहे.मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत विविध केंद्रांवर घडलेल्या कॉपी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बैठे पथक वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली असून त्यापैकी ८ लाख ६५ हजार ७४० मुले,तर ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर आहेत.एकूण ५ हजार १११ मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
- Advertisement -

