Monday, October 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षेचे हॉल तिकीट..

आता दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षेचे हॉल तिकीट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार १२ जानेवारीपासून परीक्षेचे हॉल तिकीट(प्रवेशपत्र)उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अश्यातच आता येत्या,२० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावीच्या) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे ऑनलाईन माध्यमातून उद्या,मंगळवार २० जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यातच,दहावीची प्रॅक्टीकल आणि तोंडी परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार आहे. त्यानुसार,इयत्ता दहावी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे संबंधित माध्यमिक शाळांनी मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहेत. हॉल तिकीट देतांना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये.छापील प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित शाळांनी आपल्या विभागीय मंडळाशी संपर्क साधावा,असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे; अशा विद्यार्थ्यांनाच हॉल तिकीट उलपब्ध होणार आहे.तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप शुल्क भरलेले नाही; अशा विद्यार्थ्यांना शुल्क भरल्यानंतर हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक शाळांनी ही प्रवेशपत्रे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून www.mahahsscboard.in, www.mahahsscboard.in वरून डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करावीत,असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गॅस एजन्सी धारकांचा संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशभरातील एलपीजी वितरक(गॅस एजन्सीधारक)कमिशनवाढ व इतर विविध मागण्यांसाठी आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी देशाची राजधानी दिल्ली येथे आंदोलन करणार आहेत.एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशनने...

वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट...

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!