Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीआमदार रामदास मसराम यांची टीआरटीआय आयुक्तांशी जात पडताळणी प्रकरणांवरील अडचणींवर सखोल चर्चा..

आमदार रामदास मसराम यांची टीआरटीआय आयुक्तांशी जात पडताळणी प्रकरणांवरील अडचणींवर सखोल चर्चा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी पुण्याचे तत्कालीन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (TRTI)आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड(IAS)यांची गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात सदिच्छा भेट घेतली.यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवितांना येणाऱ्या विविध गंभीर अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली.
गडचिरोली जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असून अनेक दुर्गम व आदिवासी भागांमध्ये इंटरनेट व दळणवळणाच्या सुविधांचा अभाव आहे.परिणामी, अनेक समाजबांधवांकडे अद्याप जात वैधता प्रमाणपत्र नसून शिक्षण,नोकरी व विविध शासकीय योजनांपासून ते वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण होत आहे,अशी बाब आमदार मसराम यांनी निदर्शनास आणून दिली.तसेच जात पडताळणी समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सातत्याने होणारे स्थलांतरण,तसेच त्यासाठी वापरण्यात येणारे आधार चुकीचे असून सध्या १६९ पेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली.अशा परिस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्थलांतरण झाल्यास प्रकरणे अधिक काळ प्रलंबित राहण्याची शक्यता असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.या सर्व बाबींची दखल घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमाती बांधवांना दिलासा मिळावा,प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा व योग्य उपाययोजना राबवाव्यात,यासाठी आमदार रामदास मसराम यांनी आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्याशी सकारात्मक चर्चा करून प्रयत्न करण्याची मागणी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. – वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी...

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!