Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीथंड पेय चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची होतेय लूट - प्रत्यक्षात एमआरपीमध्येच थंड पेय चार्जेसचा...

थंड पेय चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची होतेय लूट – प्रत्यक्षात एमआरपीमध्येच थंड पेय चार्जेसचा असतो समावेश- वैध मापन शास्त्र विभाग वा जिल्हाधिकाऱ्यांकडे करा तक्रार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- उन्हाळ्याची चाहूल हल्ली सुरू झाली आहे.बाहेर ठिकाणी जाणारे वा बाहेर ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांचा उन्हामुळे जीव कासावीस होऊन दुकानांतून मिळणारे थंड पेय पिण्याची इच्छा अनेकांची होत असते.अशा वेळेस थंड पेयाची मागणी वाढत असल्याने अनेक गावात,शहरात थंड पेय उपलब्ध केली जातात.अशातच स्वीट मार्ट,हॉटेल,आईस्क्रीम पार्लर,मॉल, सिनेमा थिएटर,पानठेले,विविध सभागृह आदी ठिकाणी थंड पेय चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची लूट करतांना दिसून येतात.थंड पेय चार्जेसच्या नावाखाली दुकानदार ग्राहकांकडून अतिरिक्त एक ते पाच रुपये वसूल करीत आहेत.परंतु प्रत्यक्षात एमआरपीमध्येच थंड पेय चार्जचा समावेश असतो.परंतु ही बाब अनेक ग्राहकांना माहीत नसल्यामुळे त्यांची दुकानदारांकडून फसवणूक केली जात आहे.त्यामुळे थंड पेयासाठी दुकानदाराने थंड चार्ज लावल्यास त्याची तक्रार करण्याचे आवाहन ग्राहकांसाठी लढा देणाऱ्या संघटनांनी केले आहे.एमआरपीमध्ये थंड पेय चार्जचा समावेश असतो.परंतु अलीकडच्या काळात कोल्डड्रिंक म्हणजे थंड पेय.हे पेय थंड असतांनाच देणे दुकानदारांसाठी बंधनकारक आहे.एमआरपीमध्ये थंड चार्जेसचा समावेश असतो.त्यामुळे ग्राहकांना त्यासाठी वेगळे पैस मोजण्याची गरज नसते.थंड चार्जेसच्या नावाखाली दुकानदार ग्राहकांची लूट करतात.एमआरपीमध्ये थंड चार्जेसचा समावेश असतो.परंतु ग्राहक विरोध करीत नसल्यामुळे दुकानदारांची चांदी होत आहे.त्यामुळे ग्राहकांनी थंड चार्जेसच्या नावाखाली अतिरिक्त पैसे न देता अशा दुकानदारांची वैध मापन शास्त्र विभागाकडे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुन अशा प्रवृत्तींना विरोध करावा.

थंड चार्जच्या नावाखाली ग्राहकांनी अतिरिक्त पैसे देऊ नये; दुकानदाराने अतिरिक्त पैसे मागितल्यास ग्राहकांनी वैध मापन शास्त्र विभाग किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.’आपली तक्रार आपला अधिकार’ जोपर्यंत अमलात आणले जाणार नाही; तोपर्यंत असेच चित्र सुरू राहणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!