उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही महिन्यांपासून मोठ- मोठे नक्षली नेते स्वतःहून सरकारपुढे नतमस्तक होऊन हातात संविधान स्वीकारू लागल्याने नक्षली संघटनेला मोठे हादरे बसले आहेत.यामुळे भेदरलेले काही नक्षलवादी गनिमी काव्याने उपद्रव माजवू पाहत असल्याची घटना आज,रविवार ९ नोव्हेंबर रोजी छत्तीसगड राज्याच्या सुकमा जिल्ह्यात उघडकीस आली आहे.सुरक्षा दलाचे एक पथक नक्षलविरोधी अभियानावर असतांना आज दुपारच्या सुमारास नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी (प्रेशर इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस)स्फोटात सीआरपीएफचा (केंद्रीय राखीव पोलिस दल)एक जवान जखमी झाला आहे.सदरची घटना सुकमा जिल्ह्याच्या फुलबागडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोगुंडा जवळील जंगली टेकड्यांमध्ये घडली.स्फोटामुळे केंद्रीय राखीव दलाच्या ७४ व्या तुकडीच्या जवानाच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर जखमी जवानास पुढील उचारासाठी एअरलिफ्ट करून रायपूरला नेण्यात आले.जंगली टेकड्यांमध्ये नक्षलविरोधी अभियान राबवित असतांनाच जवानाचे पाय चुकून प्रेशर आयईडीच्या संपर्कात आले आणि मोठा स्फोट झाला.इतर जवानांच्या सदरची बाब लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात जवान गंभीर जखमी..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

