- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-कमी-अधिक म्हणजेच राहू-राहू
पडणाऱ्या पावसाने काहीकाळ विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र,कधी बरसेल हे सांगताच येत नाही. पावसाने थांबा दिला असला तरीही नदी,नाले भरून वाहू लागले आहेत.त्यामुळे अद्याप गडचिरोली जिल्ह्यातील पाच मार्ग पुरामुळे बंद असून हळूहळू सर्व मार्ग खुले होण्याची शक्यता आहे.आज,सोमवार २८ जुलै रोजी सकाळच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा- असरअली-जगदलपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग-६३ (वडधम गावादरम्यान)( हलक्या वाहनाकरिता वाहतूक सुरू आहे.जड वाहतूक बंद),अहेरी तालुक्यातील अहेरी-वटरा रस्ता राज्यमार्ग ३७० (वटरा नाला),चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा-बोरी-गणपूर रस्ता प्रजिमा-१७(हळदीमाल नाला),चामोर्शी- मार्कंडादेव रस्ता प्रजिमा-३७ (मार्कंडादेव नाला)तसेच चामोर्शी तालुक्यातीलच चपराळा ते चौडमपल्ली रस्ता प्रजिमा-५३ हे सर्व मार्ग पुरामुळे बंद असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
- Advertisement -

