Saturday, June 27, 2026
Homeगडचिरोलीमहसूल विभागीय क्रीडा स्पर्धेत गडचिरोली जिल्हाची मोहर - २७ पदकांसह सांघिक खेळात...

महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेत गडचिरोली जिल्हाची मोहर – २७ पदकांसह सांघिक खेळात विजेतेपद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. कोविड प्रादुर्भावानंतर प्रथमच यावर्षी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरावरील स्पर्धांच्या यशस्वी आयोजनानंतर नागपूर येथे २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत गडचिरोली महसूल विभागाने बाजी मारत सांघिक क्रीडा प्रकारामधे प्रथम क्रमां‍क पटकविला.यात क्रिकेट प्रथम, कब्बडी प्रथम, खो खो (पुरुष) प्रथम, खो खो (महिला) प्रथम, थ्रो बॉल (महिला) प्रथम व व्हॉलीबॉल (पुरुष) मधे प्रथम क्रमांक मिळाला. वैयक्तीक क्रीडा प्रकारात मैदानी, बॅडिंटन, पोहणे, कॅरम, बुद्धिबळ स्पर्धांमध्ये जवळपास सुवर्ण पदके २०, रौप्य पदके ४ तर कास्यपदके ३ असे मिळून २७ पदके प्राप्त करून सांघिक विजेतेपदही प्राप्त केले आहे.तसेच,संचालन मध्ये द्वितीय क्रमांक व सांस्कृतीक कार्यक्रम मध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे.

कोरोनानंतर प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत 81 क्रीडा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विभागातील सुमारे १५०० महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सर्व स्पर्धेचे आयोजन मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे तसेच क्रीकेट सामना व्ही.सी.ए.मैदान व पोहण्याची स्पर्धा नागपूर महानगरपालिकेच्या तरणतलावावर आयोजित करण्यात आली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच या क्रीडा स्पर्धांदरम्यान उपस्थित राहूल सहभागींना शुभेच्छा दिल्या होत्या.जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.तर अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेच्या आयोजनासाठी यशस्वी कार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!