Sunday, October 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज होणार अकरावी प्रवेशाची अंतिम यादी जाहीर..

आज होणार अकरावी प्रवेशाची अंतिम यादी जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्रीय पद्धतीने सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाची अंतिम यादी आज,रविवार ८ जून रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. त्यानंतर दोन दिवस कोटा प्रवेश होणार असून ११ जून पासून प्रवेशाची पहिली फेरी सुरू होणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच दिवशी प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली.६ व ७ जून रोजी आक्षेप व तक्रारी नोंदविण्यात आल्यानंतर आज प्रवेशाची अंतिम यादी जाहीर होणार आहे.त्यानंतर ९ ते ११ तारखेपर्यंत अल्पसंख्याक व महाविद्यालयीन व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश केले जाणार आहेत.११ जूनपासून प्रवेशफेरी सुरू होणार आहे.
असे असणार वेळापत्रक👇
८  जून रोजी निवडलेल्या महाविद्यालयांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.तर ९ ते ११ जून रोजी अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश.१० जून रोजी विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांची माहिती जाहीर,११ ते १८ जून रोजी पहिल्या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश.२० जून रोजी दुसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया सुरू.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!