Sunday, August 9, 2026
Homeनाशिकलग्नासाठी केली बस; लग्नाची वेळही गेली निघून, नवरदेवाची वाट पाहू-पाहू दमेजून गेली...

लग्नासाठी केली बस; लग्नाची वेळही गेली निघून, नवरदेवाची वाट पाहू-पाहू दमेजून गेली नवरी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नाशिक :- राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभारामुळे नाशिकच्या नांदगाव येथील एका कुटुंबातील मुलाच्या लग्नाचा मुहूर्त टळला.नांदगाव येथील सतीश बिडवे यांचे मुलाचे लग्न संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात  बाबरा येथील तरुणीसह ठरले होते.सहलींसह विविध समारंभांसाठी एसटी बसेस भाडेतत्वावर दिल्या जातात.बिडवे यांनी लग्न सोहळ्यासाठी वऱ्हाडींना घेवून जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नांदगाव आगाराची बस प्रासंगिक कराराने बुक केली होती.आगाराने चालकाला चुकीचा पत्ता दिल्याने बस नांदगाव ऐवजी नस्तनपूर येथे पोहचली.यामुळे बस चुकीच्या मार्गावर गेल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा बस एक तास उशिराने  निघाली.साधारण ५० किलोमीटर अंतर गेल्यावर बस रस्त्यातच बंद पडली.यामुळे वऱ्हाडी संतापले.बस दुरुस्त करण्यासाठी अडीच तिथेच ताटकळत बसावे लागले.अडीच तासा नंतर पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला.यानंतर पर्यायी बस उपलब्ध करुन देण्यात आली.या सगळ्या वेळात लग्नाचा मुहूर्त निघून गेला.लग्नाचा मुहूर्त चुकल्याने बिडवे परिवारासह वऱ्हाडी मंडळीना मनस्ताप सोसावा लागला तर नवरदेवाची वाट पाहू-पाहू नवरी दमली होती.बसच्या गलथान कारभारामुळे लग्नाचा मुहूर्त ही गेला आणि सर्वांना मनस्ताप सोसावा लागला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!