Monday, August 24, 2026
Homeजालनाअजबच प्रकार..अन् परीक्षेसाठी एकही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचलाच नाही.....- बारावीच्या परीक्षेचा हिंदी विषयाचा...

अजबच प्रकार..अन् परीक्षेसाठी एकही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचलाच नाही…..- बारावीच्या परीक्षेचा हिंदी विषयाचा होता पेपर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

जालना :-एकीकडे राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत.यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.जालन्यातही शिक्षण विभागाबरोबरच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न करून परीक्षा केंद्रांवर भेटी देत आहेत. काल जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी कॉपी करतांना १६ विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडले आहे.त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घाबरण्याजोगे वातावरण पसरले आहे.

जलण्यातील जामवाडी येथील रंगनाथराव पाटील परीक्षा केंद्रावर हिंदी विषयाच्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी फिरकला नाही.त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोलीस,केंद्रप्रमुख यांच्यासह सर्वांना ताटकळत बसावे लागले.आज बारावीचा हिंदी विषयाचा पेपर होता. राष्‍ट्रभाषेचा पेपर असयांना या विषयाकडे विद्यार्थ्यानी पाठ फिरविल्‍याचे दिसून आले.हिंदी हा विषय दोनच विद्यार्थ्यांनी घेतलेला होता.मात्र केंद्र प्रमुखांनी दोन्हीही विद्यार्थ्यांना फोन लावून परिक्षेला बोलावले; तरीही विद्यार्थी परीक्षेसाठी आले नाहीत.त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेत शुकशुकाट पाहायला मिळाला. एकही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी न आल्यानं शिक्षकांना देखील पेपर न घेताच रिकाम्या हाताने परीक्षा केंद्रावरून मागे परतावे लागले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!