Sunday, September 6, 2026
Homeअहील्यानगरचक्क नायब तहसीलदारच सापडला कॉपी पुरवतांना...

चक्क नायब तहसीलदारच सापडला कॉपी पुरवतांना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
अहिल्यानगर :-जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावर चक्क नायब तहसीलदार आपल्या मुलास कॉपी पुरवतांना सापडल्याने परिसरात एकच धांदल उडाली आहे.अनिल तोडमल असे नायब तहसीलदाराचे नाव आहे.सध्या सोशल मीडियावर सदर प्रकारचा व्हिडिओ प्रचंड वायरल होत आहे.मुख्यमंत्र्यांनी कॉपी मुक्त अभियानासाठी दिलेले निर्देश सदर नायब तहसीलदारास लागू झाल्यास खरोखरच बडतर्फ कारवाई होणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नायब तहसीलदार अनिल तोडमल यांचा मुलगा बारावीत आहे.सध्या बारावीची परीक्षा सुरु आहे. अशातच मुलाला मदत म्हणून नायब तहसीलदार पाथर्डीमधील बारावीच्या परीक्षा केंद्रावर पोहोचले.
पेपर सुरु झाल्यानंतर त्यांनी मुलाला कॉपी देण्याचा प्रयत्न केला.परंतु,याचवेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.तहसीलदार स्वतःच्याच मुलाला कॉपी पुरवत असल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी या परीक्षा केंद्रावर ही घटना घडली असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परीक्षा केंद्र गाठले.आता संबंधित नायब तहसीलदार अनिल तोडमल यांच्यावर आता काय कारवाई केली जाते,हे लक्षवेधी ठरणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!