- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-दोन वर्षांपासून सुरळीतपणे सुरू असलेल्या प्रेमसंबंधाचा शेवट विनयभंगासह मारहाणीच्या गुन्ह्याने झाला असल्याची घटना गडचिरोली शहरातील रामनगर येथे उघडकीस आली आहे.तरुणावर युवतीस बेदम मारहाण आणि शर्ट फाडून विनयभंग केल्या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) ७४,७५,७८ (१),३५१ (३) नुसार गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,पीडित २० वर्षीय युवती व आरोपी ३३ वर्षीय तरुण हे दोघेही गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील असून, नातेवाईक आहेत.युवती गडचिरोली शहरातील लांझेडा रोडवरील आदिवासी वसतिगृहात राहून एका खासगी महाविद्यालयात बीए द्वितीय वर्षात शिक्षण घेते व पोलिस भरतीचीही तयारी करते,तर आरोपी देखील पोलिस भरतीची तयारी करतो.तिची या तरुणाशी चार वर्षापासून ओळख असून,दोन वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. मात्र,अनेकदा तरुण तिच्याशी वाद घालायचा.१ फेब्रुवारी रोजी युवतीने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला,त्यानंतर त्याने वारंवार कॉल करण्याचा प्रयत्न केला.शिवाय टेक्स्ट मेसेज पाठवून तिला ‘माझ्याशी बोलली नाहीस,तर बघ तुझे काय हाल करतो,तुला चपलेले मारहाण करीन, जीवे मारून टाकीन,’ अशी धमकी दिली.४ फेब्रुवारी रोजी युवती नित्याप्रमाणे सकाळी सहा वाजता जिल्हा क्रीडा संकुलावर सरावासाठी गेली असता,तेथे जाऊन त्याने तिचा मोबाइल हिसकावून नेला.मोबाइल आणून न दिल्याने दुपारी १ वाजता युवती त्याच्या खोलीवर गेली असता,त्याने तिला बेदम मारहाण केली आणि शर्ट फाडून विनयभंग देखील केला.त्यानुसार घटनेची माहिती राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्या डॉ.सोनल कोवे यांना मिळताच त्यांनी वसतिगृहात धाव घेतली.पीडितेला उपचारासाठी साहाय्य केले.डॉ.सोनल व डॉ.चेतन कोवे यांनी तिला धीर दिला.पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी पीडितेचे समुपदेशन करून संवेदनशीलपणे प्रकरण हाताळले व त्यानुसार पीडितेने याबाबत काल, बुधवारी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.दोघेही पोलीस भरतीची तयारी करीत असल्याने तसेच नातेवाईक असल्याने घरच्यांना कळू नये, यासाठी दोघांचीही नावे उघड करण्यात आलेली नसल्याचे सदर प्रकारावरून स्पष्ट होत आहे.
- Advertisement -

