- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात मुलींचा जन्मदर घसरत असल्याने राज्य सरकारने आता गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या टोळीविरोधात दंड थोपटले आहेत. अशी चाचणी करणाऱ्यांना रोखण्यासाठी याबाबतची माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला असून,लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
राज्यात अलीकडे मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या कमी होत आहे.दर हजार मुलामागे मुलींची संख्या साडेआठशे ते नऊशे दरम्यान असल्याचे काही जिल्ह्यातील आकडेवारीवरून दिसत आहे.ही गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले जातात.स्टिंग ऑपरेशन केले जात आहेत.पण,यामध्ये मदत करणाऱ्या गर्भवती महिला,कार्यकर्ते व संघटनांना सन्मानाऐवजी आरोपीप्रमाणे वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी आहेत.हजार रुपयाचे तुटपुंजे बक्षीस मिळत असल्याने आणि काही वेळा तेही मिळत नसल्याने या मोहिमेत सहभागी होण्यास फारसे कुणी पुढे येत नाहीत.
याबाबतच्या अनेक तक्रारी राज्याचे नवे आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्यापर्यंत पोहोचल्या.त्यांनी तातडीने राज्यातील आरोग्य अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.गर्भलिंग चाचणी विरोधाच्या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना त्रास दिला,तर कारवाई करण्याचा इशाराच त्यांनी दिला.दरम्यान,ही मोहीम अधिक व्यापक व्हावी यासाठी मोठे बक्षीस देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.यामुळे या मोहिमेला अधिक गती येण्याची चिन्हे आहेत.
- Advertisement -

