Friday, July 17, 2026
Homeभुवनेश्वरवारंवार घरात बेडूक घुसायचा; संतापून त्याने बेडकाचीच बनवली भाजी अन् खाऊन....

वारंवार घरात बेडूक घुसायचा; संतापून त्याने बेडकाचीच बनवली भाजी अन् खाऊन….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भुवनेश्वर: ओदिशामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.घरात बेडूक शिरल्यानं वैतागलेल्या एका आदिवासी व्यक्तीने चक्रावून टाकणारा प्रकार केला. आदिवासी व्यक्तीने बेडकाला पकडून त्याचे तुकडे केले.त्याची भाजी करून ती कुटुंबाला खाऊ घातली. त्यानंतर आदिवासी व्यक्ती झोपायला गेला.बेडकाची भाजी खाल्ल्याने मुलांची प्रकृती बिघडली आणि एकाचा मृत्यू झाला.तर दुसऱ्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बेडकाची भाजी खाल्ल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव सुमित्रा मुंडा आहे.ती सहा वर्षांची होती. क्योंझर जिल्हा मुख्यालयात शुक्रवारी रात्री तिने अखेरचा श्वास घेतला.तर सुमित्राचा ४ वर्षांचा भाऊ मुनीची प्रकृती गंभीर आहे.क्योंझर जिल्ह्यातील जोडा ब्लॉकमध्ये ही घटना घडली.सध्या परिसराच याच घटनेची चर्चा आहे.

बेडकाचे तुकडे करून त्याची भाजी करणाऱ्या मुना मुंडालाच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. वडिलांनी बेडकाची भाजी खाल्ली.मात्र त्यांना काहीच झाले नाही.मात्र मुलांची प्रकृती बिघडली.मुलांना नेमके काय झाले ते डॉक्टरांना समजत नव्हते. अखेर वडिलांनी झालेला प्रकार कथन केला.तो ऐकून डॉक्टरांना धक्काच बसला.
डॉक्टरांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.यानंतर पोलिसांनी क्योंझरपासून ७० किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या गुरुदा गावात जाऊन मुना मुंडाला (४०) अटक केली.पोलिसांनी मुनाकडे झालेल्या प्रकाराची चौकशी केली.’एक बेडूक सतत घरात शिरायचा. त्यामुळे मी वैतागलो होतो.गुरुवारी संध्याकाळी मी त्या बेडकाला पकडले.त्याचे लहान लहान तुकडे केले आणि मटण करतात त्याप्रमाणे त्याला मसाला टाकून शिजवले,’ असा घटनाक्रम मुनाने सांगितला.

मुनाने बेडकाची भाजी खाल्ली.त्याच्यासोबत त्याची दोन मुलेदेखील जेवली.त्यानंतर रात्री उशिरा मुलांना उलट्या झाल्या.ती बेशुद्ध होऊन पडली.शुक्रवारी त्यांना क्योंझर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे शुक्रवारी रात्री सुमित्राचा मृत्यू झाला.तर त्याचा मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे.या प्रकरणी बामेबाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एटापल्ली परिसरात दुचाकी वाहनांची संख्या पाचपट वाढली.. – सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी १६ संवेदनशील ठिकाणे निश्चित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघातांचे प्रमाण,प्राणांतिक अपघात आणि अपघातप्रवण ठिकाणांची गंभीर दखल घेत सर्व संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कामकाज न करता...

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!