Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअजब उमेदवाराची गजब मागणी...! उमेदवाराला चिन्ह मिळाला 'चपला'... - चक्क उमेदवाराने मतदानाच्या...

अजब उमेदवाराची गजब मागणी…! उमेदवाराला चिन्ह मिळाला ‘चपला’… – चक्क उमेदवाराने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात चप्पल घालून येणाऱ्यांवर केली कारवाईची मागणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-धाराशिव जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघ हा निवडणूक लागल्यापासूनच चर्चेत राहिला आहे.आघाडीत उमेदवारीवरून झालेल्या गोंधळामुळे तर आता निवडणुकीच्या चिन्हामुळे.येथील एका उमेदवाराला ‘चपला’ निशाणी मिळाली आहे.त्यांनी आयोगाला पत्र लिहून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात चप्पल घालून येणाऱ्यांवर कारवाईची अजब मागणी केली. मात्र,आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आहे.परंडा मतदारसंघातून गुरुदास कांबळे हे अपक्ष उमेदवार आहेत.त्यांना चपला हे निवडणूक चिन्ह आयोगाकडून देण्यात आल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे.
दरम्यान,मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या २०० मीटर परिघात निवडणूक चिन्ह बाळगणे,दर्शवणे यावर प्रतिबंध घातला जातो,या नियमाचा दाखला देत गुरुदास कांबळे यांनी मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही चपला घालू नयेत,घातल्यास त्यांच्यावर कारवाई करावी; अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली.शिवाय,मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांनाही त्या घालता येणार नाहीत.त्यामुळे पायाला दुखापत होऊ नये,यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणीही कांबळे यांनी पत्राद्वारे केली.या त्यांच्या पत्राची चर्चा चांगलीच रंगली आहे.
सहाय्यक निवडणूक अधिकारी जयवंतराव पाटील👇
चपला या नियमित वापराचे साधन आहेत.त्यामुळे मतदान केंद्र परिसरात त्यांचा वापर थांबवता येऊ शकत नाही.त्यामुळे कांबळेंची मागणी फेटाळण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!