Sunday, July 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान...फसवणुकीसाठी नवनवीन शक्कल..! 'आर्थिक अडचणीत आहे; रुग्णालयात भरती असून,उपचारासाठी पैसे हवे', अशी...

सावधान…फसवणुकीसाठी नवनवीन शक्कल..! ‘आर्थिक अडचणीत आहे; रुग्णालयात भरती असून,उपचारासाठी पैसे हवे’, अशी गळ फेसबुक मेसेंजरवर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ऑनलाइन फसवणुकीचे एकापेक्षा एक प्रकारचे गुन्हे घडत आहेत.फसवणुकीसाठी नवनवीन शक्कल गुन्हेगारांकडून वापरली जात आहे. सीम बंद पडणार आहे,एटीएम कार्ड ब्लॉक होणार आहे; असे सांगून ठगांकडून बँक खात्याची माहिती घेतली जात होती.नंतर संपूर्ण पैसा परस्पर काढला जात होता.आता मात्र वेगळे कारण सांगितले जात आहे. ‘आर्थिक अडचणीत आहे,रुग्णालयात भरती असून,उपचारासाठी पैसे हवे’, अशी गळ फेसबुक मेसेंजरवर घातली जाते व फसवणूक केली जात आहे.
ऑनलाइन फसवणुकीमध्ये संबंधितांना सुटलेली लालच त्याचा घात करते.अनेक प्रकारचे ॲपसुद्धा धोकादायक आहेत.बऱ्याचदा बँकेचा किंवा विमा कंपनीचा तसेच गुगल पे व फोन पे तसेच इतर कुठल्या संस्थेचा कस्टमर केअरचा नंबर गुगलवर सर्च केला जातो.या ठिकाणी अनेकांचे खोटे नंबर गुगलवर येतात.त्यांना फोन केल्यानंतर त्यांच्याशी संभाषण होते; यावेळी ते जे सांगतील तसे केल्यानंतर आर्थिक फसवणूक होते.अशा प्रकारे अनेकांना फोन करून लाखो रुपयांचा गंडा घातला जातो.याप्रकरणी पोलिसात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.बँकेतून परस्पर रक्कम काढून घेतल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.दरम्यान,अशा ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
फसवणुकीपासून सतर्कता बाळगा👇
मोबाइलचे सीम बंद पडणार आहे.ते अपडेट करायचे आहे.असे सांगून तुमची माहिती विचारली जाते.नंतर मेसेजद्वारे आलेला ओटीपी मागितला जातो.यातूनही फसवणूक होऊन बँक खात्यातील रोख रक्कम काढण्यात येते.एटीएम बंद पडू शकते.तुम्ही बँक खात्यासंदर्भातील माहिती कोणालाही सांगू नये, आधार बँक खात्याशी लिंक करायचे आहे; असे सांगूनदेखील रक्कम काढून घेतल्याचे प्रकार घडलेले आहेत.अतिशय सहज पद्धतीने हवे तितके कर्ज मिळवा,असे आमिष दाखवून संपूर्ण बँक डिटेल्स घेतले जाते.कर्जासाठी गॅरंटरची गरज लागत नाही,हे पाहून अनेकजण आमिषाला बळी पडतात आणि फसवणूक होते. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या फोन कॉलवर कुठलीही माहिती देऊ नका.कोणतीही बँकिग प्रक्रिया ही नियमाच्या अधीन राहून केली जाते. त्यामुळे सहज कर्ज मिळत नाही.स्वस्तात वस्तू खरेदीच्या प्रलोभनाला बळी पडू नये.मोबाइलवर ॲप डाउनलोड करण्यापूर्वी सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.अन्यथा तुमची या ॲपद्वारे देखील फसवणूक होऊ शकते.त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!