Thursday, April 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तहॉटेलच्या रूमचे बुकिंग करून मुलासोबत जाणे म्हणजे मुलीने शरीरसंबंधासाठी परवानगी दिली असा...

हॉटेलच्या रूमचे बुकिंग करून मुलासोबत जाणे म्हणजे मुलीने शरीरसंबंधासाठी परवानगी दिली असा त्याचा अर्थ होत नाही- मुंबई उच्च न्यायालय – दोषमुक्तीचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हॉटेलच्या रूमचे बुकिंग करून मुलासोबत तेथे जाणे म्हणजे मुलीने शरीरसंबंधासाठी परवानगी दिली असा त्याचा अर्थ होत नाही; असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.आरोपीला बलात्काराच्या गंभीर आरोपातून दोषमुक्त करण्याचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करताना न्या.भारत देशपांडे यांनी हा निर्वाळा दिला. पीडिता आरोपीसोबत हॉटेलच्या रूममध्ये गेली व तिने शरीरसंबंधासाठी संमती दिली हा सत्र न्यायालयाचा निष्कर्ष अत्यंत चुकीचा आहे; अशी कानउघडणी न्या. देशपांडे यांनी केली.गुलशेर अहमद असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या दोषमुक्तीविरोधात गोवा पोलिसांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते.न्यायालयाने गोवा पोलिसांची मागणी मान्य केली.अहमदविरोधात आरोप निश्चिती करून रीतसर खटला चालवण्याचे आदेशही न्या.देशपांडे यांनी सत्र न्यायालयाला दिले आहेत.
आरोपीने जबरदस्ती केल्यानंतर पीडिता लगेचच रूमच्या बाहेर आली.रडत-रडत ती हॉटेलच्या लॉबीमध्ये आली. तिने पोलिसांना फोन केला. पोलिस तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे पीडितेने सर्व प्रकार सांगितला.परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला हॉटेलमध्ये बोलवले व अत्याचार केला, असा जबाब पीडितेने दिल्याचे न्यायालयाने नमूद केले.पीडितेचा जबाब महत्त्वाचा आहे.याकडे सत्र न्यायालयाने दुर्लक्ष केले.आरोप निश्चितीसाठी सबळ पुरावे आहेत की नाहीत याची शहानिशा करण्यात आली नाही.सत्र न्यायालयाचा दोषमुक्तीचा निकाल अयोग्य असून तो रद्द करावा; अशी मागणी गोवा पोलिसांनी केली.
आरोपीने म्हटले की,पीडितेने आणि मी हॉटेलच्या रूमचे बुकिंग केले.त्या रूमची निवड पीडितेने केली होती.आम्ही जेवण केल्यानंतर ती स्वेच्छेने रूममध्ये आली.बलात्कार झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद नाही.सत्र न्यायालयाचा दोषमुक्तीचा निकाल योग्य आहे; असा दावा आरोपी अहमदने केला होता.तो न्यायालयाने फेटाळून लावला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!