- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शासनाने २००५ पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेंतर्गत हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून जहाल महिला नक्षल्याने काल,शनिवारी ९ नोव्हेंबरला गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.लक्ष्मी बंडे मज्जी वय ४२ वर्षे,रा.कुगलेर,ता.बेद्रे, भैरमगड,जि.बिजापूर (छत्तीसगड) असे आत्मसमर्पित नक्षलीचे नाव आहे.शासनाने तिच्यावर २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
लक्ष्मी बंडे मज्जी ही लहान असतांना गावात माओवाद्यांच्या बैठकीदरम्यान गावातील लोकांसोबत माओवाद्यांसाठी जेवण घेऊन जात होती.सन २०१७ पासून ती भामरागड व इंद्रावती एरिया कमिटीमध्ये सीएनएम (चेतना नाट मंच) मध्ये सदस्य पदावर भरती झाली.दलममध्ये असतांना माओवाद्यांना जेवण पुरवणे तसेच इतर आवश्यक साहित्य पुरविणे आदी कामे ती करत होती.माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील,गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल,सीआरपीएफचे पोलिस उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा,पोलिस अधीक्षक नीलोत्पल,सीआरपीएफचे कमांण्डट दाओ इंजिरकान किंडो यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
कां केले जाते आत्मसमर्पण👇
दलममध्ये असतांना विवाह झाला तरी स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन जगावे लागले.आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जात नाही.नक्षल दलममधील ज्येष्ठ माओवाद्यांकडून स्त्रियांना भेदभावाची वागणूक दिली जाते. दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरिता जनतेकरिता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वतःसाठीच वापरतात.वरिष्ठ माओवादी नेते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी तरुण-तरुणींचा वापर करून घेतात.खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात. चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात.मात्र,महिला यात ठार मारल्या जातात.
नक्षल्यांचे आत्मसमर्पण👇
गडचिरोली पोलिस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते आतापर्यंत एकूण ३० तर आजपर्यंत एकूण ६७८ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
माओवाद्यांवर पोलिस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर आहे.जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल.असे गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
- Advertisement -

