Saturday, October 24, 2026
Homeगडचिरोलीदोन दुचाकींची धडक; पाच जण पडले रस्त्यावर.. - रस्त्यावर पडताच अंगावरून गेला...

दोन दुचाकींची धडक; पाच जण पडले रस्त्यावर.. – रस्त्यावर पडताच अंगावरून गेला ट्रक; एकजण ठार तर चार जण गंभीर जखमी… – कोरची तालुक्यातील आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-दोन दुचाकींची धडक झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या पाच जणांच्या अंगावरुन लोहखनिज भरलेला ट्रक गेल्याने एक महिला जागीच ठार,तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यातील बेळगावनजीकच्या कोसमी गावाजवळ घडली.
सेवाबाई रामसाय कोरेटी वय ३५ वर्षे,रा.दामेसरा,ता. कुरखेडा असे मृत महिलेचे,तर रमशिला दसरु काटेंगे वय ३६ वर्षे,रा.दोडके (छत्तीसगड),माणिक नरेटी वय २५ वर्षे,रा.गोठणपार,ता.देवरी,जि.गोंदिया,दर्शना माणिक हलामी वय २२ वर्षे व सोनम मडावी वय २४ वर्षे अशी जखमींची नावे आहेत.
सेवाबाई कोरेटी व रमशिला काटेंगे या दोन बहिणी भाऊबिजेसाठी चिलमटोला येथील आपल्या माहेरी गेल्या होत्या.आज कोरचीचा आठवडी बाजार असल्याने त्या माणिक नरेटी या नातेवाईक युवकासमवेत मोटारसायकलने बाजाराला जात होत्या.समोरुन सोनम मडावी हा दर्शना हलामी यांना घेऊन मोटारसायकलने येत होता.कोसमी गावाजवळ दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यामुळे पाचही जण खाली पडले.एवढ्यात समोरुन सुरजागड लोहखाणीतून लोहखनिज घेऊन येणारा सीजी ९७- एवाय १५३७ क्रमांकाच्या ट्रक त्यांच्या अंगावरुन गेला.या भीषण अपघातात सेवाबाई कोरेटी ही जागीच ठार झाली.उर्वरित चार जण गंभीर जखमी झाले.त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.पोलिसांनी ट्रक जप्त केला असून,ट्रकचालक फरार आहे.या अपघातातील दर्शना हलामी यासुद्धा भाऊबिजेसाठी नांदळी या माहेरगावी गेल्या होत्या.आपल्या गावाकडे परतत असताना त्यांनाही अपघाताला सामोरे जावे लागले.अपघातात ठार झालेल्या सेवाबाई कोरेटी हिचा मृतदेह छिन्नविछीन्न झाला.मृतदेहाचे तुकडे रस्त्यावर पडले होते.माहिती मिळताच बेळगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी उदय पाटील यांनी स्वतः मृतदेहाचे विखुरलेले तुकडे गोळा केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!