- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे तिन्ही पक्ष प्रत्येकी ९० जागांवर लढतील,तर उर्वरित १८ जागा मित्रपक्षांना सोडल्या जातील,असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी सायंकाळी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला होता.मविआतील तिन्ही पक्ष प्रत्येकी ८५ जागांवर लढणार असल्याचे ते म्हणाले होते.पण काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज शुक्रवारी दिल्लीत बोलताना त्यांनी हा फॉर्म्युला आता ९० वर पोहोचल्याचे सांगितले.ते म्हणाले,आमचा ८५-८५-८५ चा फॉर्म्युला आता ९०-९०-९० वर पोहोचला आहे.उर्वरित १८ जागा आम्ही आमच्या मित्रपक्षांना सोडल्या आहेत.त्यातून किती सुटतील ते पाहिले जाईल.पण काँग्रेस १०० च्या वर जाईल का? याची बेरीज अजून करण्यात आली नाही.
- Advertisement -

