Saturday, October 17, 2026
Homeगडचिरोलीसर्वसामान्य जनतेची विविध प्रकारची प्रश्ने सोडविण्याकरीता जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन

सर्वसामान्य जनतेची विविध प्रकारची प्रश्ने सोडविण्याकरीता जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे,त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज,निवेदने,संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय,मुंबई येथे स्विकारुन त्यावर कार्यवाही करण्याकरीता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात.मात्र यामध्ये अधिकाधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.

सदर कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न,शासन स्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज,निवेदने इत्यादीवर कार्यवाही करण्यात येत आहे. सदर कार्यवाहीमध्ये अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता,पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांच्या जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्यामधील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे,त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज,निवेदने,संदर्भ हे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष,मंत्रालय,मुंबई येथे न देता सदर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे देण्याकरीता स्वंतत्र कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे.सदर कक्षामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी यांना “पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी” म्हणून नेमण्यात आलेले आहे. तरी गडचिरोली जिल्ह्यामधील सर्व नागरीकांनी मा.मुख्यमंत्री महोदयांना सादर करावयाचे जिल्ह्यामधील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे,त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ हे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष,मंत्रालय मुंबई येथे न देता सदर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील स्थापन करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री सचिवालय कक्षामध्ये” देण्यात यावे; असे आवाहन समाधान शेंडगे,निवासी उपजिल्हाधिकारी तथा पदसिध्द विशेष कार्य अधिकारी (मुख्यमंत्री सचिवालय कक्ष), जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!