Thursday, April 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभविष्यात शिक्षक भरती होण्याची शक्यता कमी..!

भविष्यात शिक्षक भरती होण्याची शक्यता कमी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता आहे.अश्यातच सुधारित संचमान्यता निकषानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश शासनाने दिल्याने नव्या संचमान्यता निकषामुळे राज्यात हजारो शिक्षक पदे कमी होणार आहेत.यामुळे राज्यातील डोंगराळ,दुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त भागांतील कमी पटांच्या शाळांना याचा मोठा फटका बसणार आहे.यात गडचिरोली,अमरावती व डोंगरी-दुर्गम,आदिवासी भाग असलेल्या जिल्ह्यात याचा मोठा फटका बसणार आहे. विशेष म्हणजे,अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन करण्यात येणार आहे; पण,शिक्षक पदे कमी झाल्याने भविष्यात शिक्षक भरती होण्याची शक्यता कमी आहे.२३ ऑक्टोंबर २०२५ रोजी शाळेच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार शासनाने २०२५-२६ ची संचमान्यता अंतिम केली आहे.१५ मार्च २०२४ रोजीच्या संच मान्यतेच्या सुधारित आदेशानुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन तीन मार्चपर्यंत जिल्हास्तरावर,२५ मार्चपर्यंत विभागस्तर आणि ३१ मार्चपर्यंत राज्यस्तरावर करण्याचे आदेश राज्याच्या प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळांना  मोठा फटका बसणार आहे.
  • विजय कोंबे,राज्याध्यक्ष,प्राथमिक शिक्षक समिती👇
शिक्षण कायद्यानुसार शाळात शिक्षक पदे मंजूर करणे आवश्यक आहे.मात्र,महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये बदल करून संचमान्यतेचे नवीन निकष आणले आहेत.त्याचा फटका ग्रामीण भागातील शाळांना बसणार आहे. शाळांच्या पटाऐवजी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!