Friday, June 26, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात ६ जून ते २१ जून कालावधीत ‘अतिसार नियंत्रण पंधरवडा' मोहिम..

गडचिरोली जिल्ह्यात ६ जून ते २१ जून कालावधीत ‘अतिसार नियंत्रण पंधरवडा’ मोहिम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-अतिसार आजारामुळे होणारे बालमृत्यु शून्यावर पोहोचविणे हे शासनाचे ध्येय असून यासाठी जिल्ह्यात ६ जून ते २१ जून २०२४ या कालावधीत ‘अतिसार नियंत्रण पंधरवडा’ मोहिम प्रभावीपणे राबवण्याच्या सुचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.   

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र  गोकुळनगर येथे आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांच्या हस्ते अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले.पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी पालकांना काळजी घेणाऱ्यांचे योग्य समुपदेशन करावे,अति जोखमीचे क्षेत्र आणि दुर्बल घटकांवर विशेष लक्ष देण्याच्या सुचना शिंदे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या. 

उन्हाळा व पावसाळा या हंगामामध्ये पूर व नैसर्गिक आपत्ती दरम्यान अतिसाराच्या संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठी एक प्रकारची पूर्व तयारी आहे. अतिसार असलेल्या ० ते ५ वयोगटातील सर्व मुलांना ओ.आर.एस.आणि झिंक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे.पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरामध्ये ओआरएस व झिंक चा वापर तसेच उपलब्धता वाढवणे,अतिसारासह जलशुष्कता असलेल्या बाल रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे,शहरी झोपडपट्टया,पूरग्रस्त भाग,आरोग्य सेविका कार्यरत नसलेली उपकेंद्रे,भटक्या जमाती,वीटभट्टी कामगार, स्थलांतरीत मजूर आणि बेघर मुले आदी जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणे,मागील २ वर्षात अतिसाराची साथ असलेले क्षेत्र व पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असलेले क्षेत्र यावर विशेष लक्ष देणे, हे धोरण आरोग्य विभागाने निश्चित केले आहे.   

जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ प्रफुल्ल हुलके,अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमित साळवे,डॉ.राहुल थिगळे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, शंतनु पाटील जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, प्रविण गेडाम विस्तार अधिकारी,डॉ.सिमा गेडाम वैद्यकिय अधिकारी,डॉ.पल्लवी गावंडे पी.एच.एम. व सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केद्र कर्मचारी, आशा वर्कर व लाभार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!