- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत पळसगाव उपवनक्षेत्रातील कराडी शेतात रविवारी रात्रीच्या सुमारास जंगली हत्तीच्या कळपाने उच्छाद घालित धानपिकांची प्रचंड नासाडी केली आहे.यामध्ये बालाजी महादेव रामटेके व मनोहर सदाशिव राऊत या दोन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.पीक डौलात आले असताना हत्तींनी ते भूईसपाट केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
गेल्या आठवडाभरापासून कुरखेडा वनपरिक्षेत्रातील शेतशिवारात धुमाकूळ घालणाऱ्या जंगली हत्तीच्या कळपाने मार्गक्रमण करीत आता आरमोरी वनपरिक्षेत्रात धडक दिली आहे.या वनपरिक्षेत्रातील पाटणवाडा व वैरागड परिसरात संचारत असताना त्यांनी येथील धानपिकांची प्रचंड नासधूस केली होती. दरम्यान रविवारी,रात्रीच्या सुमाराला हत्तींनी पळसगाव उपवनक्षेत्र हद्दीतील कराडी जंगलात मार्गक्रमण करीत थेट शेतशिवारात धानपिकांची नासधूस केली.यात दोन शेतकऱ्यांचे उभे धानपिक पूर्णतः नेस्तनाबूत झाले.सोमवारी सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला.
- Advertisement -

