Monday, August 17, 2026
Homeतुर्कीसोमवार पासून तुर्कीत ५५० वेळा भूकंप; महा भयानक भूकंपाने अख्खा देश सरकला....-...

सोमवार पासून तुर्कीत ५५० वेळा भूकंप; महा भयानक भूकंपाने अख्खा देश सरकला….- भूकंप होण्यामागचे पहा कारण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

अंकारा : तुर्कीच्या अंकारा येथे सोमवारी झालेल्या शक्तीशाली भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. सोमवारी पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी हा भूकंप झाला.या भूकंपात गाढ झोपेत असलेल्या नागरिकांचा जागीच मृत्यू झाला.भूकंपात आतापर्यंत तब्बल ७ हजार लोक दगावले आहेत.१५ हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत.भूकंप अत्यंत शक्तीशाली होता. तो इतका की भूकंपामुळे संपूर्ण तुर्की देश १० फुटाने सरकला आहे.सोमवारपासून गेल्या तीन दिवसात तुर्कीत ५५० वेळा भूकंप आला आहे.या भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाल्याने संपूर्ण देशात तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

सीरीयाच्या तुलनेत तुर्कीची टेक्टोनिक प्लेट्स पाच ते सहा मीटर सरकू शकते, असे इटलीचे भूकंप तज्ज्ञ डॉय कार्लो डोग्लियोनी यांनी सांगितले.तुर्की अनेक प्रमुख फॉल्टलाइनवर आहे.या फॉल्टलाइन एनाटोलियन प्लेट,अरेबियन प्लेट आणि युरेशियाई प्लेटशी निगडीत आहे.त्यामुळे भूकंपाने तुर्कीचे प्रचंड नुकसान झाले आहे.हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार,एनाटोलियन प्लेट आणि अरेबियन प्लेट दरम्यानची २२५ किलोमीटरची फॉल्टलाइन तुटली आहे.

शाळांना सुट्टी जाहीर

दरम्यान, सोमवारी पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी भूकंप झाला.तुर्कीत सोमवारपासून आतापर्यंत ५५० वेळा भूकंपाचे झटके जाणवले. तुर्की आणि सीरियात आतापर्यंत ६२०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती अर्दोगन यांनी देशातील दहा प्रांतात तीन महिन्यांसाठी आणीबाणी लागू केली आहे.शाळांना १३ फेब्रुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतासह ७० देशाने तुर्कीला मदतीचा हात दिला आहे.

भूकंप का होतो?

जमिनीच्या आत सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत.या प्लेट्स सातत्याने फिरत असतात.जेव्हा या प्लेट्स एकमेकांना धडकतात, एकमेकांवर रगडतात किंवा एकमेकांवर चढतात वा एकमेकांपासून वेगळ्या होतात तेव्हा जमीन हलू लागते.त्यालाच भूकंप म्हणतात.रिश्टर स्केलवर भूकंप मोजला जातो. त्याला रिक्टर मॅग्निट्यूड स्केल म्हणतात.

(साभार – टिव्ही 9)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!