Monday, May 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसोन्याची दर वाढीत चमक तर चांदीची जोरदार उसळी.. - वर्षाच्या अखेरपर्यंत काही...

सोन्याची दर वाढीत चमक तर चांदीची जोरदार उसळी.. – वर्षाच्या अखेरपर्यंत काही खरे नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मौल्यवान धातूंच्या किंमती कमी होण्याचे नावच घेत नसल्याने ऐन लग्न सराईच्या धामधुमीत सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसू लगला आहे.विशेष म्हणजे,आज,सोमवार ५ जानेवारी रोजी सोन्याने दर वाढीत चमक दाखवली आहे, तर चांदीने जोरदार उसळी मारत इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन(IBJA)नुसार,१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९३९ रुपयांनी वाढून १ लाख ३५ हजार ७२१ रुपयांवर पोहोचला आहे.यापूर्वी तो १ लाख ३४ हजार ७८२ रुपयांवर होता.त्याचबरोबर,एक किलो चांदीची किंमत २ हजार २२५ रुपयांनी वाढून २ लाख ३६ हजार ७७५ रुपयांवर आली आहे.यापूर्वी त्याची किंमत २ लाख ३४ हजार ५५० रुपये प्रति किलो होती. यापूर्वी २९ डिसेंबर २०२५ रोजी सोने १ लाख ३८ हजार १६१ रुपये आणि चांदी २ लाख ४३ हजार ४८३ रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती.
महत्वाचे म्हणजे,सोने-चांदीचे दर हे वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे असतात.इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या सोन्याच्या दरांमध्ये ३ टक्के जीएसटी,घडणावळ शुल्क(मेकिंग चार्ज)आणि ज्वेलर्सचा नफा(मार्जिन)समाविष्ट नसतो.त्यामुळे शहरांमधील दर यापेक्षा वेगळे असतात.या दरांचा वापर भारतातील बँकांची बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सार्वभौम सुवर्ण रोख्यांचे दर निश्चित करण्यासाठी करते. अनेक बँका गोल्ड लोनचे दर निश्चित करण्यासाठी याचा वापर करतात.
गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये सोन्याची किंमत ५७ हजार ३३ रुपयांनी (७५%) वाढली आहे.३१ डिसेंबर २०२४ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१ हजार १६२ रुपये होती,जी ३१ डिसेंबर २०२५ रोजी १ लाख ३३ हजार १९५ रुपये झाली.या काळात चांदीचा भावही १ लाख ४४ हजार ४०३ रुपयांनी (१६७%) वाढला.३१ डिसेंबर २०२४ रोजी एक किलो चांदीची किंमत ८६ हजार १७ रुपये होती,जी या वर्षाच्या शेवटच्या दिवशी २ लाख ३० हजार ४२० रुपये प्रति किलो झाली.
सोन्याच्या दरातील वाढीची प्रमुख तीन कारणे,ती म्हणजे अमेरिकेने व्याजदर कमी केल्यामुळे डॉलर कमकुवत झाला आणि सोन्याची होल्डिंग कॉस्ट कमी झाली,त्यामुळे लोकांनी खरेदी सुरू केली.रशिया-युक्रेन युद्ध आणि जगात वाढलेल्या तणावामुळे गुंतवणूकदार सोन्याला सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानून खरेदी करत आहेत.चीनसारखे देश आपल्या रिझर्व्ह बँकेत
सोन्याचा साठा वाढवत आहेत,ते वर्षभरात ९०० टनांपेक्षा जास्त खरेदी करत आहेत,त्यामुळे दर वाढत आहेत.अश्यातच चांदीतील तेजीची प्रमुख कारणे म्हणजे, सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात वापर,चांदी आता फक्त दागिने नसून,एक आवश्यक कच्चा माल बनली आहे.त्यातच,अमेरिकन कंपन्या चांदीचा मोठा साठा जमा करत आहेत, जागतिक पुरवठ्यातील कमतरतेमुळे किंमती वाढल्या.उत्पादक स्पर्धेत उत्पादन थांबण्याच्या भीतीने सर्वजण आधीच खरेदी करत आहेत,यामुळे येत्या काही महिन्यांतही आणखी दर वाढणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!