Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीसार्वजनिक सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात निष्काळजीपणा.. - राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना...

सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात निष्काळजीपणा.. – राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस.. – विहित मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास फौजदारी कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मान्सूनचा काळ जवळ येत असतांनाच, रस्ते आणि पुलांची कामे विहित मुदतीत पूर्ण न केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी ४ मे रोजी दोन स्वतंत्र नोटिसा जारी केल्या आहेत.यामध्ये प्रामुख्याने दोन मोठ्या प्रकल्पांमधील दिरंगाईवर बोट ठेवण्यात आले आहे.
  • लाहेरी-बीनागुंडा मार्ग👇
भामरागड तालुक्यातील लाहेरी-बीनागुंडा मार्गावरील गुंडेन्नूर नाल्यावरील दोन महत्त्वाच्या पुलांचे बांधकाम १८ जुलै २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र, दोन वर्षांचा विलंब होऊनही हे काम अद्याप अपूर्णच आहे.२९ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता ही बाब उघडकीस आली.
  • आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग👇
 या मार्गाचे काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना लांबच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो,ज्यामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसीमध्ये नमूद केले की, गडचिरोली जिल्हा हा घनदाट अरण्याने आणि नद्यांच्या जाळ्याने व्यापलेला आहे.मान्सून लवकरच सुरू होणार असून पुलांअभावी बीनागुंडा परिसरातील गावांचा संपर्क तुटण्याची आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित होण्याची भीती आहे.जबाबदार शासकीय अधिकारी म्हणून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना न करणे हे वर्तन अत्यंत बेजबाबदारीचे व अशोभनीय असल्याचे  जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांना   बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद आहे.
  •  कठोर कारवाईचे संकेत👇
या दिरंगाईमुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या विविध कलमान्वये(कलम ३०.२,५५ आणि ५६)ही नोटीस बजावण्यात आली आहे.या अंतर्गत पुलांच्या कामाबाबत ५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लेखी स्पष्टीकरण मागवण्यात आले होते.त्याचबरोबर, आलापल्ली-सिरोंचा रस्ते कामाबाबत ६ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष हजर राहून उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.विहित मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास,रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी आणि सार्वजनिक गैरसोयीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सर्वस्वी जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई प्रस्तावित केली जाईल,असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!