Saturday, September 26, 2026
Homeगडचिरोलीसर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्यात येतील.तसेच आश्रमशाळांसाठी नवीन प्रमाणित कार्यपद्धती(एसओपी)निश्चित करण्यात येईल,असे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी सांगितले.
धानोरा तालुक्याच्या जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात रविवारच्या मध्यरात्री  दोन वाजच्या सुमारास विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना घडली.या दुर्घटनेत दीपिका इतवा लकडा (वर्ग ६ वा),सुष्मिता सरोजीत मंडल(वर्ग ८ वा)आणि अनु गाजुरं कोरेटी (वर्ग २ रा)या तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
सर्पदंश झालेल्या अन्य विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.गंभीर प्रकृती असलेल्या दीपीका मडावी या विद्यार्थिनीला प्रशासनाने एअरलिफ्ट सुविधेद्वारे पुढील उपचारासाठी हलवून आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले.
सहपालकमंत्री ॲड.जयस्वाल यांनी धानोरा येथील शवागृहात मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.त्यानंतर जपतलई येथील आश्रमशाळेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रमेश उपस्थित होते.
  • १४ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक👇
आश्रमशाळांच्या व्यवस्थापन व विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात गठित विविध समित्यांचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासह शासन व्यवस्थेत आवश्यक बदल करण्याच्या दृष्टीने येत्या,१४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात येणार असल्याचे ॲड.जयस्वाल यांनी सांगितले.या बैठकीत विद्यार्थी सुरक्षा,आश्रमशाळा व्यवस्थापन,विविध समित्यांचे कामकाज, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संबंधितांची जबाबदारी यांचा आढावा घेऊन नवीन एसओपी निश्चित करण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
  • कुटुंबीयांना आर्थिक मदत👇
दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार असून, त्यापैकी प्रत्येकी १ लाख रुपयांची तात्काळ मदत सुपूर्द करण्यात आली आहे.उर्वरित मदतीची प्रक्रिया सुरू आहे.याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी अतिरिक्त ५ लाख रुपयांची मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.अन्य शासकीय योजनांमधूनही संबंधित कुटुंबीयांना शक्य ते सर्व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल,असे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!