Monday, September 7, 2026
Homeगडचिरोलीलोकसभा निवडणूक : नामनिर्देशन पत्रासोबत ना-देय प्रमाणपत्र आवश्यक…-भाडे,विद्युत आकार, पाणीपट्टी व दुरध्वनी...

लोकसभा निवडणूक : नामनिर्देशन पत्रासोबत ना-देय प्रमाणपत्र आवश्यक…-भाडे,विद्युत आकार, पाणीपट्टी व दुरध्वनी आदी देयके भरणे आवश्यकच…अन्यथा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरतांना उमेदवारांना निवडणूक आयोगामार्फत विविध सूचना देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने मागील दहा वर्षाच्या कालावधीत कोणत्याही वेळी शासकीय निवासस्थानाचा ताबा घेतला असल्यास त्याच्या वापराचे संबंधीत विभागाचे भाडे,विद्युत आकार,पाणीपट्टी व दुरध्वनी आदी देयके भरून सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे ना-देय प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.

स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडने बंधनकारक

उमेदवारांनी लोकसभा निवडणूकीचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडावे.हे खाते उमेदवाराला स्वत:चे नावे किंवा निवडणूक प्रतिनिधीसोबत संयुक्तरित्या काढता येईल.सदर बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर उघडलेले असणे आवश्यक असून यात केवळ निवडणूकीशी संबंधीतच व्यवहार करायचे आहेत.

अपक्ष उमेदवारांना १० प्रस्तावक आवश्यक

उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करतांना याच लोकसभा मतदार संघातील प्रस्तावक असणे बंधनकारक आहे.मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारांना एक मतदार प्रस्तावक तर अपक्ष आणि इतर राज्यातील मान्यताप्राप्त अथवा नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांना १० मतदार प्रस्तावक असावे. 

१२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असल्याने अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्राची सांक्षाकित प्रत जोडणे, अनामत रक्कम रुपये बारा हजार पाचशे रोखीने किंवा चलनाने भरणा करणे, शपथपत्रातील सर्व रकाने स्पष्ट शब्दात पूर्णपणे भरणे, सक्षम प्राधिकाऱ्या समोर शपथ घेतल्याबाबतचे शपथपत्र सादर करणे,आदी काही सूचना सोबतच भारत निवडणूक आयोगाने नामनिर्देशनाबाबत निर्गमित केलेल्या सविस्तर सूचनांचे अवलोकन उमेदवारांनी करावे; असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!