Tuesday, September 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलग्नाच्या मुलींसह सोनेही भाव खाऊ लागला ; सोन्याने गाठला उच्चांक..!

लग्नाच्या मुलींसह सोनेही भाव खाऊ लागला ; सोन्याने गाठला उच्चांक..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-तीन दिवसांपूर्वी किंचित घट नोंदविणाऱ्या सोन्याने काल,शुक्रवारी पुन्हा उच्चांक गाठत ऐन गुढीपाडवा सणाच्या आधीच २४ कॅरेटच्या तोळ्याचा भाव ९१ हजार ५०० रुपये झाल्याने सोने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नसल्याचे सदरच्या भाव वाढीवरून दिसून येत आहे.
सध्या स्थितीत लगीन सराई सुरू झाली आहे.अनेक तरुण लग्नासाठी मुलींच्या शोधात आहेत.मात्र, अनेकांचे लग्नच जुळत नसल्याने वयोमानात वाढ होत आहे.लग्न जुळले तर लग्नात थोडे तरी सोने खरेदी करावी लागतात.अशातच आता लग्नाच्या मुलींसह सोनेही भाव खात असल्याने ‘इकडे आड व तिकडे विहीर’ अशी अनेकांची अवस्था झाली आहे.
सोमवारी सोने दरात १६० रुपयांची घसरण नोंदविली गेल्यानंतर,सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी  २५ मार्चला ३३० रुपयांनी सोने कमी झाले होते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरात आणखी घसरण होईल,अशी अपेक्षा होती.परंतु,आठवड्याच्या अखेरच्या तीन दिवसांत सोने तब्बल १,६९० रुपयांनी वधारले. काल,शुक्रवारी २४ कॅरेट,प्रतितोळा ९१ हजार ५०० रुपयांचा दर नोंदविला गेला आहे.चांदी दरातील तेजी कायम असून,अवघ्या दोनच दिवसांत चांदी ४ हजार १०० रुपयांनी वधारली आहे.बुधवारी २६ मार्चला चांदीचे दर १ लाख ९०० रुपयांनी घसरले होते.मात्र,मागील दोन दिवसांत पुन्हा एकदा चांदी दराने उसळी घेत चांदी थेट १ लाख ५ हजारांवर गेली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा संकल्प फाउंडेशनतर्फे गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा येथे आज,सोमवार १४ सप्टेंबर रोजी संकल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील तीन...

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेतांना पर्यावरणाची हानी होणार नाही,याची काळजी घेणे...

अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना १ लाख ३० हजाराची आर्थिक मदत वितरित.. -भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या पाठपुराव्याला यश..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झालेले कुरखेडा शहराच्या गांधी वार्डातील ज्येष्ठ नागरिक नरेश हडप यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून १ लाख ३० हजारांची आर्थिक मदत...

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू; तर कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तावशी संभाजीनगर महामार्गावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!