उद्रेक न्युज वृत्त :-केरळमधील वायनाड लोकसभा जागेवरील पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवित प्रियंका गांधी ह्या खासदार बनल्या आहेत.विजय मिळवल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी उद्या म्हणजेच बुधवारी २७ नोव्हेंबरला लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेणार आहेत.त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात गांधी कुटुंबाची उपस्थिती नोंदवली जाणार आहे.गांधी घराण्यातील तीन सदस्य संसदेत एकत्र उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ असेल.काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या राज्यसभेच्या सदस्य आहेत.तर राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.महाराष्ट्र निवडणुकीत काँग्रेसची निराशा झाली असतांना प्रियंका गांधी यांचा संसदेत प्रवेश होत आहे.हरयाणातील पराभवामुळे निर्माण झालेल्या चिंतेतून काँग्रेस सावरली नसतांनाच आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनीही काँग्रेसला निराशेच्या भोवऱ्यात ग्रासले.अशा वेळी प्रियांका गांधी यांच्यावर संसदेत काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी दबाव असेल.त्याचवेळी काँग्रेसला निराशेच्या भोवऱ्यातून बाहेर काढून नव्या ऊर्जेने व उत्साहाने भरावे लागणार आहे.संसद भवन संकुलात काँग्रेसचे अनेक नेते,विशेषतः तरुण खासदार प्रियंका गांधी यांची लोकसभेच्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे खूप आनंदी दिसले. काँग्रेसच्या एका महिला खासदाराने म्हटले की,प्रियंका गांधी यांच्या संसदेत प्रवेश केल्यानंतर महिला आणि तरुणांशी संबंधित प्रश्नांना धार देण्यास काँग्रेसला मदत होईल. लोकसभेत प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीमुळे काँग्रेस खासदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.प्रियंका गांधी यांच्या संसदेत येण्याने प्रमुख विरोधी पक्षाला नवसंजीवनी मिळू शकेल,असा विश्वास काँग्रेस खासदारांनी व्यक्त केला आहे.राहुल गांधी यापूर्वीच सत्ताधारी पक्षाविरोधात जोरदार आवाज उठवत आहेत.आता प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीने सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस पूर्ण उत्साहाने काम करेल.काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी जेव्हा लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतील. त्यावेळी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत तिची आई सोनिया गांधी,पती रॉबर्ट वाड्रा,मुलगी मिराया आणि मुलगा रेहान वाड्रा हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी पाठोपाठ आता प्रियंका गांधीही सत्ताधारी पक्षाला टाकणार कोंडीत… – प्रियंका गांधी उद्याला घेणार लोकसभा सदस्यत्वाची शपथ…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES