- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या सूचनेनुसार त्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांनी आज शुक्रवारी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.पुलांसह रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल आणि निधीची अडचण येऊ दिली जाणार नाही,असा मुख्यमंत्र्यांचा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला.या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
चिरेपल्ली,पत्तीगाव,कोतागुडम आणि मरणेली ग्रामसभांच्या वतीने अहेरी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २१ ऑक्टोंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होते.रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंतत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकर यांना प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन चर्चा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेदरम्यान पालकर यांनी त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी सोयीचा व महत्त्वाचा मार्ग असून तो शंभर टक्के पूर्ण केला जाईल.नाल्यांवरील पुलांच्या बांधकामासह रस्त्याचे काम दर्जेदार होईल आणि निधीची कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असा मुख्यमंत्र्यांचा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दखल आणि काम पूर्ण करण्याबाबत मिळालेल्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
- Advertisement -

