Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीरक्त चाचणीसाठी दाम दुप्पट न देता शासकीय रुग्णालयात करा मोफत चाचण्या

रक्त चाचणीसाठी दाम दुप्पट न देता शासकीय रुग्णालयात करा मोफत चाचण्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- शासन स्तरावरून सर्वसामान्य नागरिक व गोरगरीब जनतेसाठी अनेक प्रकारच्या मोफत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.मात्र काही योजना वा उपलब्ध सोयी सुविधांबद्दल अनेकांना माहितीची जाण व माहीतच पडत नसल्याने लाभधारक नागरिक दाम दुप्पट,तिप्पट देऊन; खाजगी सेवांचा आधार घेऊन स्वतःच्या खिशाला मोठ्या प्रमाणावर कात्री लावतांना दिसून येत येतात.मोठ्या प्रमाणावर खिशाला कात्री लागू नये; यासाठी शासकीय रुग्णालयात अनेक चाचण्या मोफत व माफक दरात उपलब्ध असल्याने शासकीय रुग्णालयांचा आधार घेऊन चाचण्या कराव्यात.खासगी प्रयोगशाळेत रक्त तपासणी करण्यासाठी दामदुप्पट पैसे मोजावे लागतात.मात्र आता ही तपासणी शासकीय रुगणालयात गरोदर माता,दारिद्रय रेषेखालील,ज्येष्ठ नागरिक,शासकीय कर्मचारी,माजी सैनिक आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी मोफत करण्यात येतात.तसेच अन्य व्यक्तींना अतिशय अल्पदरात चाचण्या करता येतात.

जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये,ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यामध्ये येणाऱ्या सर्वच रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या लॅबच्या माध्यमातून मोफत केल्या जातात.त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना या चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांमध्ये दामदुप्पट न देता शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेमध्ये विविध प्रकारच्या चाचण्या कराव्यात.यात हिमोग्लोबिन,आरबीसीएस,डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स,इएसआर,कोलेस्ट्रॉल,रक्तातील शर्करा, लिव्हर फंक्शन,लघवीच्या चाचण्या,तापाच्या विविध चाचण्या केल्या जातात.तसेच प्रेग्नन्सी टेस्ट ही केली जाते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!