उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली:- जिल्ह्याच्याअनेकगावांमध्येसर्वसान्य नागरिक तसेच गोर-गरीब जनतेची कळकळ लक्षात घेता; अनेक पदाधिकारी तसेच कार्यकत्यांनी मिळून शासनाच्या तसेच गावातील ग्रामसभेच्या माध्यमातून ज्यांना अती आवश्यक आहे; अशांना प्राधान्यक्रम ठरवून घरकुल मिळावे; अशातच अन्न व वस्त्रा सोबतच निवाऱ्याची प्राथमिक तसेच मूलभूत गरजा भागविण्यात यावी; यासाठी नेहमीच प्रयत्न केले असल्याचे दिसून येत आहे.
कित्तेकजण घरकुल मिळावे; यासाठी जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला अधिवास प्रमाणपत्र व तसेच इतर दाखल्याची जुळवाजुळव करून शासकीय कार्यालयात अनेक दिवसांपासून तसेच कित्तेक महिन्यांपासून हेलपाटे मारताना दिसून येतात.हेलपाटे मारून बऱ्याच कालावधीमध्ये वेळ आणि पैसा खर्च झाल्यानंतर एखाद्या कुटुंबीयांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो; मात्र अशातही ज्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला गेला आहे; असे अनेकजण घरकुल मिळालेल्या घरात किरायाने घरकुल देत असल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत गावातील कित्तेक सरपंच तसेच प्रशासकीय अधिकारी असलेल्या ग्रामसेवक तसेच विस्तार अधिकारी यांना कळवूनही कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने गडचिरोली जिल्ह्याचे नव नियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आरुषी सिंह आपण तरी लक्ष घालणार काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

